Pages

पनामा किंवा मर रोग : या रोगामुळे पनामा केळीचा संपूर्णपणे नाश झाल्यामुळे त्याला मर (रोग पनामा) रोग म्हणतात. पुणे जिल्ह्यातील सोनकेळीवर हा रो...

पनामा किंवा मर रोग : केळी

No comments:
 

पनामा किंवा मर रोग : या रोगामुळे पनामा केळीचा संपूर्णपणे नाश झाल्यामुळे त्याला मर (रोग पनामा) रोग म्हणतात. पुणे जिल्ह्यातील सोनकेळीवर हा रोग मोठ्या प्रमाणावर येऊन केळीच्या बागांचे फार मोठे नुकसान झाले आहे. आम्लयुक्त जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. हा रोग जमिनीतील कवकांमुळे होतो. केळीच्या पिलांना तसेच मोठ्या खुंटांना हा रोग झाल्यामुळे ती मरतात. ग्रोमिशेल ही जात या रोगास जास्त बळी पडत. प्रथम खुंटावरील साल पिवळी पडून सुकते. नंतर केळीची पाने डेरे पिवळी होऊन सुकतात. खुंटाभोवती पाने लोंबतात व नुसते खोड उभे राहते. मुख्य खोड सुकून त्याचा पानांपर्यंतचा भाग चिरलेला दिसतो. रोगट खुंट फळधारणेपूर्वीच मरतो. परंतु केळी निसवल्यानंतर हा रोग पडल्यास केळीची वाढ सारखी होत नसून ती अवेळी पिकतात. रोगट खुंटाच्या खालच्या गड्ड्यात काळ्या रेषा दिसतात. रोगकारक बुरशी मुळांवरील अन्नवाहिन्यांमध्ये वाढते. परिणामी, अन्नरसाचा वरचा मार्ग खुंटतो. अशा खुंटाच्या गड्ड्या लगतच्या पिलांच्या कांद्यातही रोगकारक कवक जाऊन तेथे रोगाचा उपद्रव होतो.


उपाय : ज्या जमिनीत हा रोग झाला असेल अशा जमिनीत केळी लागवड टाळावी. तसेच केळी लागवडीकरता रोगमुक्त अशा बेण्यांचा वापर करावा. या रोगास प्रतिकारक अशा बसराई, हरीसाल यासारख्या जातींची निवड करावी. रोगट बेणे मुळासकट काढून त्याचा नायनाट करावा. जमिनीला पाणी दिल्याने कवकाचा प्रादुर्भाव कमी होतो. बोर्डोमिश्रण 1 टक्के द्रावण प्रत्येक झाडास 5 लिटर याप्रमाणे दिल्यास रोगाचा प्रसार थांबतो. एक-दीड महिन्याने पुन्हा एकदा वरीलप्रमाणे सेरेसान द्यावे.

No comments:

Post a Comment